पायरी 1: खाली दिलेल्या देशांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सेवा जाहिराती दाखवण्यासाठी जाहिरातदारांनी – पहिली पायरी म्हणून–G2RS द्वारा पडताळणी करून घेतलीच पाहिजे. G2RS वित्तीय सेवा पडताळणी पत्र मिळवण्यासाठी जाहिरातदारांनी दाखवून दिले पाहिजे की: (1) त्यांना एखाद्या संबंधित नियामक संस्थेने अधिकृत केले आहे; किंवा (2) ते यातून सूट मिळण्यास पात्र आहेत. कृपया नोंद घ्या: काही विशिष्ट प्रकारच्या जाहिरातदारांना G2RS पडताळणी मिळवण्याची आवश्यकता नसते. G2RS वित्तीय सेवा पडताळणी पत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया Google ची वित्तीय उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींविषयक धोरणे पाहा.
पायरी 2: ज्या वित्तीय सेवा जाहिरातदारांनी G2RS वित्तीय सेवा पडताळणी पत्र मिळवले असेल त्यांनीसुद्धा त्यांच्या ओळखीची पडताळणी Google च्या जाहिरातदार पडताळणी प्रोग्रॅमच्या मार्फत करून घेतली पाहिजे. Google कडून आलेल्या जाहिरातदार पडताळणीची ईमेल पाहण्यासाठी कृपया तुमचा ईमेल इनबॉक्स पाहा. टीप: जाहिरातदारांनी जर पूर्वी Google चा जाहिरातदार पडताळणी प्रोग्रॅम पूर्ण केला असेल, तर त्यांनी पायरी 2 पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.
पायरी 3: पायरी 1 आणि 2 पूर्ण केल्यानंतर जाहिरातदार त्यांच्या निवडीच्या देशामध्ये वित्तीय सेवा जाहिराती दाखवण्यासाठी अर्ज करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जाहिराती दाखवण्यासाठी अर्ज कराल, तेव्हा तुम्हाला तुमचा G2RS कोड विचारला जाईल. याशिवाय, जाहिरातदारांनी Google च्या वित्तीय उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींविषयक धोरणे यांचे अनुपालनही केले पाहिजे. Google Ads चा जाहिरातींसाठीचा अर्ज येथे मिळेल:
पडताळणी प्रक्रिया
जर तुमच्या व्यवसायाला एखाद्या लागू असलेल्या नियामक संस्थेने एखाद्या विशिष्ट देशामध्ये वित्तीय सेवा पुरवण्यासाठी अधिकृत केले असेल, तर पडताळणीसाठी खालच्या “अर्ज करा” बटनावर क्लिक करून अर्ज करा.
अत्यंत महत्त्वाचे: तुम्ही या पडताळणी प्रक्रियेत पुरवलेली व्यवसायाशी माहिती संबंधित रजिस्ट्रीमध्ये उपलब्ध माहितीशी तंतोतंत जुळली पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या संस्थेचे नाव किंवा नोंदणी क्रमांक वेगळा असेल किंवा संबंधित रजिस्ट्रीमध्ये उपलब्ध नसेल तर तुमची पडताळणी अयशस्वी होऊ शकते.
तुम्ही जर तुमचा अर्ज यशस्वीपणे सादर केला असेल, तर तुम्हाला G2RS कडून एक पुष्टीदाखल ईमेल येईल, की तुमचा अर्ज मिळाला आहे. या पुष्टीदाखल ईमेलमध्ये तुमच्या विशिष्ट अर्जासाठीचा एक कोड असेल (तुमचा “G2RS कोड”).
5 कॅलेंडर दिवसांमध्ये G2RS तुम्हाला ईमेल करून तुमच्या अर्जाची स्थिती कळवेल (म्हणजे मंजूर झाला, नाकारण्यात आला). अर्ज मंजूर झाला, तर तुम्ही जेव्हा तुमच्या जाहिराती तुमच्या निवडलेल्या देशातील अशा लोकांना दाखवण्यास अर्ज कराल की जे तुमच्या देशामध्ये वित्तीय सेवांच्या शोधात असल्याचे दिसते, तेव्हा तुम्हाला तुमचा G2RS कोड Google ला द्यावा लागेल.
सवलत प्रक्रिया
तुमचा व्यवसाय वित्तीय सेवा नियामक एजन्सीद्वारे अधिकृत नसेल तरीही तुम्ही अशा वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकता जे आर्थिक सेवा शोधत आहेत असे दिसते.
यापैकी एका सवलतीसाठी अर्ज करावा का हे ठरवण्यासाठी कृपया खालील व्याख्यांचा आढावा घ्या.
- सवलत दिलेले बिगर-वित्तीय सेवांचे जाहिरातदार: असे जाहिरातदार जे वित्तीय सेवांचा प्रचार करत नाहीत पण त्यांच्याकडे, वित्तीय सेवांच्या शोधात असल्याचे वाटत असलेल्या लोकांना शोधण्याचे सयुक्तिक कारण असते. उदाहरणे (ही संपूर्ण यादी नाही): सर्च इंजिन्स, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्स, वकिलांच्या फर्म्स.
- सवलत दिलेले वित्तीय सेवांचे जाहिरातदार: असे वित्तीय सेवाविषयक जाहिराती करणारे जाहिरातदार, ज्यांना लागू कायद्यांतर्गत नोंदणी न करण्याची सवलत आहे.
तुम्ही जर तुमचा अर्ज यशस्वीपणे सादर केला असेल, तर तुम्हाला G2RS कडून एक पुष्टीदाखल ईमेल येईल, की तुमचा अर्ज मिळाला आहे. या पुष्टीदाखल ईमेलमध्ये तुमच्या विशिष्ट अर्जासाठीचा एक कोड असेल (तुमचा “G2RS कोड”).
5 कॅलेंडर दिवसांमध्ये G2RS तुम्हाला ईमेल करून तुमच्या अर्जाची स्थिती कळवेल (म्हणजे मंजूर झाला, नाकारण्यात आला). अर्ज मंजूर झाला, तर तुम्ही जेव्हा तुमच्या जाहिराती तुमच्या निवडलेल्या देशातील अशा लोकांना दाखवण्यास अर्ज कराल की जे तुमच्या देशामध्ये वित्तीय सेवांच्या शोधात असल्याचे दिसते, तेव्हा तुम्हाला तुमचा G2RS कोड Google ला द्यावा लागेल.
अर्ज करायला तयार आहात?
कृपया तुम्हाला जेथे जाहिराती करायच्या असतील तो देश निवडा.
India – Bengali
Australia – English
Brazil – English
France – English
Germany – English
Indonesia – English
Portugal – English
Singapore – English
Taiwan – English