G2 वित्तीय सेवा पडताळणी | अटी व शर्ती(T&C Marathi)

I.          प्रस्तावना

खालील अटी व शर्ती या G2 वेब सर्व्हिसेस इन्क. (“G2”, “आम्ही” आम्हाला”) आणि Google Ads मार्फत वित्तीय उत्पादने किंवा सेवा च्या जाहिरातींसाठी पात्रता ठरवण्यासाठी, वित्तीय सेवा पडताळणी अर्ज (“अर्ज”) सादर करणारा पक्ष (“अर्जदार”, “तुम्ही”, “तुमचे”) यांच्यामधील संबंधांचे वर्णन करण्यास मदत करतात.  तुम्ही जेव्हा G2 कडे अर्ज सादर करता, तेव्हा तुम्ही या अटी व शर्ती वाचून त्या समजावून घेण्याचे आणि त्यांचे पालन करण्याचे मान्य करता.

II.        सेवांचे विहंगावलोकन

(a)  तुम्ही तुमच्या अर्जात पुरवलेली माहिती जर Google आणि G2 यांनी परस्परांमध्ये मान्य केल्यानुसार पडताळणी मानकांच्या अनुसार आहे (“G2 पडताळणी मानके”) असे जर आम्ही ठरवले, तर G2 वित्तीय सेवा पडताळणी पुरवेल (“G2 पडताळणी”). जर G2 ने त्यांच्या एकमात्र आणि संपूर्ण स्वेच्छानिर्णयानुसार ठरवले, की तुम्ही अर्जात जे उल्लेखित असू शकतील असे निकष पूर्ण करता, तर तुम्ही G2 पडताळणीमधून सवलत (“सवलत”) मिळण्यासाठी पात्र ठरू शकता.

(b)  तुम्ही मान्य करता की G2 पडताळणीसाठी किंवा सवलत मिळण्यासाठी अर्ज करणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. G2 पडताळणी मान्य करणे किंवा नाकारणे किंवा सवलत देणे याचा निर्णय G2 च्या एकमात्र आणि संपूर्ण स्वेच्छानिर्णयावर अवलंबून असून आणि तो खालील कारणांसाठी कोणत्याही वेळी पुनरीक्षण केला, नाकारला किंवा निलंबित केला जाऊ शकतो; या कारणांमध्ये खालील कारणे समाविष्ट असू शकतात, पण हे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही,(i) G2 पडताळणी मानकांमधील किंवा Google Ads च्या धोरणांमधील; बदल दर्शवणे; (ii) लागू कायदे, नियमने किंवा निदेशांचे अनुपालन करणे; किंवा (iii) फसवणूक, गैरवापर किंवा इतर अपाय होणे रोखणे.

III.       वॉरंटी

(a)  तुम्ही दर्शविता आणि खात्री देता की तुम्ही तुमच्या अर्जात किंवा इतर कोणत्याही संपर्कव्यवहारात पुरवलेली माहिती तुमच्या माहितीनुसार सत्य, बिनचूक, आणि पूर्ण आहे आणि तुम्ही सादर केलेल्या माहितीबद्दल जर तुम्हाला काही बदल किंवा चुका समजल्या तर तुम्ही तसे G2 ला त्वरित कळवण्याचे मान्य करता. अर्जदाराच्या खोट्या, दिशाभूल करणार्‍या, किंवा अपूर्ण माहितीवर आधारित केलेली कोणतीही G2 पडताळणी किंवा सवलत, G2 च्या एकमात्र आणि संपूर्ण स्वेच्छानिर्णयावर त्वरित पुनरीक्षण केली, नाकारली, निलंबित केली किंवा उलटली जाऊ शकते.

(b)  तुम्ही पुढे दर्शविता करता आणि खात्री देता की तुम्ही आणि तुमच्या व्यवसायाचे व्यवहार पूर्णपणे लागू कायद्याचे आणि नियमनांचे पालन करतात आणि तुमच्याकडे या अटी व शर्तींच्या अंतर्गत असलेल्या जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सक्षमता आणि अधिकार आहेत.

IV.       अस्वीकृती

(a)  अर्जदार मान्य करतो की G2 ही एखादी नियामक किंवा सरकारी संस्था नाही, आणि G2 च्या पडताळणी किंवा सवलत याबाबतची स्थिती म्हणजे कोणतेही कायदे किंवा नियमने यांचे, कोणत्याही प्रमाणपत्राचे किंवा अधिस्वीकृती मानकांचे, किंवा G2 पडताळणी मानकांसहित कोणत्याही Google Ads च्या धोरणांचे पूर्ण, अंशतः किंवा निरंतरचे अनुपालन यांची कोणतीही हमी नाही, तसेच तसे वर्णनही केले जाता कामा नये.

(b)  तुम्हाला समजते आणि तुम्ही मान्य करता की G2 पडताळणी किंवा एखादी सवलत यामुळे Google किंवा त्यांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाहिराती प्रसिद्ध करण्याचा कोणताही हक्क किंवा जबाबदारी प्रदान केली जात नाही. तुमची G2 च्या पडताळणी किंवा सवलत याबाबतच्या स्थितीच्या आड न येता, तुम्हाला वित्तीय उत्पादने सेवांच्या जाहिराती करण्याची परवानगी दिली जाईल की नाही, हा निर्णय एकमात्र Google च्या स्वेच्छानिर्णयानुसार घेतला जाईल. G2 पडताळणी किंवा सवलत किंवा Google ने घेतलेल्या कोणत्याही निर्णयामुळे किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही नुकसान, हानी, किंवा परिणाम (फसवणूकीसहित) यासाठी G2 कोणतीही जबाबदारी स्वीकारीत नाही.

(c)  लागू कायद्याने जोपर्यंत परवानगी असेल त्या मर्यादेपर्यंत, G2 तिच्या पडताळणी सेवा “जशा आहेत” या तत्त्वावर, कोणत्याही स्पष्ट किंवा अध्याहृत आश्वासनांविना पुरवते; यात विक्रीयोग्यता, एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी सुयोग्यता, आणि उल्लंघन न करणे यांची अध्याहृत आश्वासने देखील समाविष्ट आहेत. G2 ही कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही G2 पडताळणी किंवा सवलत यांच्या बिनचूकपणाची किंवा पर्याप्ततेची हमी देत नाही.

V.        बौद्धिक मालमत्ता

(a)  तुम्ही दर्शविता करता आणि खात्री देता की तुम्ही G2 ला पुरवलेली कोणतीही माहिती G2 च्या किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या कोणत्याही कॉपीराईट, व्यापारचिन्ह, व्यापारी गुपित, पेटंट किंवा इतर बौद्धिक मालमत्ता हक्कांचे उल्लंघन करत नाही. G2 तिचे आधीपासून अस्तित्वात असलेले सर्व बौद्धिक मालमत्ता अधिकार स्वतःजवळ कायम ठेवते, आणि या अटी व शर्तींच्या अंतर्गत G2 च्या कोणत्याही बौद्धिक मालमत्तेचे कोणतेही मालकीहक्क किंवा परवाना तुम्हाला दिला जाणार नाही.

(b)  तुम्ही पुढे मान्य करता की G2 देत असलेल्या सेवा अ-विशिष्ट आहेत, आणि या अटी व शर्तींमधील कोणतीही गोष्ट G2 ला याच किंवा तत्सम सेवा इतर पक्षांना पुरवण्यापासून रोखू शकणार नाही, यात अर्जदाराच्या स्पर्धकांचा समावेश होतो, परंतु त्यांच्यापुरतेच मर्यादित नाही.

VI.       दायित्वाची मर्यादा

जोपर्यंत कायद्याची परवानगी आहे त्या मर्यादेपर्यंत, या अटी व शर्तींच्या परिणामस्वरूप किंवा त्यांच्याशी संबंधित तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानांचे दायित्व G2 वर नसेल; यात समाविष्ट आहेत पण ते एवढ्यापुरते मर्यादित नाहीत, गमावलेला नफा, व्यवसाय गमावणे, डेटा गमावणे किंवा बदलला जाणे, तुमच्या संगणकांमध्ये किंवा संगणक प्रणालींमध्ये, डेटा फाइल्समध्ये, प्रोग्रॅम्समध्ये, किंवा माहितीमध्ये अनधिकृत प्रवेश किंवा त्यांची हानी, किंवा बदली माल किंवा सेवा मिळवण्याचा खर्च, किंवा कोणतीही अप्रत्यक्ष, खास किंवा परिणामस्वरूप हानी, मग ते असेही किंवा कशामुळेही झालेले असो, आणि दायित्वाच्या कोणत्याही तत्त्वांतर्गत झालेले असो, आणि अशा कोणत्याही नुकसान किंवा हानीबद्दल G2 ला कल्पना देण्यात आलेली असो वा नसो. अर्जदार मान्य करतो की दायित्वाच्या मर्यादा विभागामधील शर्ती या जोखमीचे रास्त प्रमाणात प्रतिनिधित्व करतात.

VII.     क्षतिपूर्ती

तुम्ही खालील गोष्टींमधून किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टींमधून निर्माण होणारे, कोणत्याही तृतीय पक्षाने (सरकारी प्राधिकरणांसहित) केलेले कोणतेही दावे, खटले, किंवा कायदेशीर कारवाई यांपासून G2 चे रक्षण करण्याचे मान्य करता: (a) तुम्ही किंवा G2 द्वारे या अटी व शर्तींचा कोणताही भंग; किंवा (b) G2, तिचे कर्मचारी, प्रतिनिधी, उपकंत्राटदार, किंवा तिचे प्रतिनिधी किंवा उपकंत्राटदार यांचे कर्मचारी यांनी केलेली फसवणूक, निष्काळजीपणा, एखादी गोष्ट करायची राहून जाणे, जाणूनबुजून केलेले गैरवर्तन, किंवा बेकायदेशीर कृत्य. जोपर्यंत कायद्याची परवानगी आहे त्या मर्यादेपर्यंत, तुम्ही G2 ला असा कोणताही खर्च, नुकसान, न्यायनिर्णय, दंड, खर्च आणि इतर कोणतीही देणी (वकिलांच्या रास्त फी सहित) यांपासून सुरक्षित ठेवण्याचे मान्य करता की जे G2 च्या अशा कोणत्याही क्षतिपूर्तींच्या प्रति झाले आहेत की जे अशा कोणत्याही तृतीय–पक्षांच्या दाव्यांमधून निर्माण होतील किंवा त्यांच्याशी संबंधित असतील.

VIII.    शासक कायदा

ज्यामुळे इतर न्यायाधिकारक्षेत्रांमधील कायदे लागू करावे लागू शकतील अशा परस्परविरोधी कायद्यांच्या तत्त्वांना प्रत्यक्षात न आणता, या अटी व शर्तींची वैधता, रचना, अंमलबजावणी आणि परिणाम यांच्यावर वॉशिंग्टन राज्य, यूएसए येथील कायद्यांचे शासन असेल. या अटी व शर्तींमधून निर्माण होणार्‍या किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वादाचे निराकरण फक्त किंग काउंटी, वॉशिंग्टन, यूएसए मधील राज्याच्या किंवा फेडरल कोर्टात केले जाईल, आणि तुम्ही या न्यायालयांच्या व्यक्तिगत अधिकारक्षेत्रांना सुस्पष्ट मान्यता देता.

IX.       स्वतंत्र पक्ष

G2 आणि अर्जदार हे स्वतंत्र पक्ष आहेत आणि या दोन्हीपैकी कोणीही, कोणत्याही कारणासाठी दुसर्‍याचा कर्मचारी, प्रतिनिधी, भागीदार, संयुक्त प्रकल्पातील सहयोगी, किंवा कायदेशीर प्रतिनिधी असल्याचे मानले जाऊ नये.  या अटी व शर्तींमध्ये स्पष्टपणे घालून दिलेल्या मर्यादा वगळता G2 तसेच अर्जदार यापैकी कोणालाही दुसर्‍यावर बंधन घालण्याचा अधिकार नसेल आणि तसेच दोघांपैकी कोणीही दुसर्‍याच्या वतीने कोणत्याही जबाबदार्‍या निर्माण करणार नाहीत. या अटी व शर्ती फक्त तुम्हाला आणि G2 ला लागू आहेत आणि त्यांच्यामुळे कोणत्याही तृतीय पक्षांसाठी कोणतेही कायदेशीर हक्क निर्माण होत नाहीत.

X.        अनपेक्षित घटना

G2 तसेच अर्जदार हे केवळ त्यांच्या रास्त नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे या अटी व शर्तींच्या अंतर्गत जबाबदारी पूर्ण करण्यामधील विलंब किंवा अपयश यासाठी दोघेही एकमेकांना जबाबदार नसतील; यामध्ये समाविष्ट आहेत पण यापुरतेच मर्यादित नाहीत, देवाची करणी, नैसर्गिक आपत्ती, युद्ध, नागरी विक्षोभ, रोग किंवा महामारी, सरकारी नियम, न्यायालयीन आदेश, किंवा कार्य न करणार्‍या पक्षाच्या कृतींमुळे निर्माण झालेले नाहीत असे कामगारांचे विवाद.

XI.       संकीर्ण

या अटी व शर्तींमध्ये केव्हाही, पूर्वकल्पना न देता, बदल किंवा अद्यतन करण्याचा हक्क G2 राखून ठेवत आहे. तुमच्या G2 पडताळणीच्या किंवा सवलत मिळण्याच्या स्थितीसाठी एक अट म्हणून तुमच्यावर या अटी व शर्तींचे, त्यांच्यामधील कोणत्याही बदलांसहित पालन करण्याची निरंतर आणि चालू राहणारी जबाबदारी आहे. कोणत्याही मर्यादेशिवाय या अटी व शर्तींचे पालन न करण्यासहित कोणत्याही कारणासाठी तुमची G2 पडताळणी किंवा सवलत यांबाबतच्या स्थितीचे पुनरावलोकन करणे, मागे घेणे, निलंबित करणे किंवा नाकारणे याचा एकमात्र आणि संपूर्ण स्वेच्छानिर्णय G2 कडे आहे.